माजरा धरणाच्या ऑफिसचा बोगळ कारभार, धरण गल्लीला ऑफीस दील्लीला पाणी जिल्ह्याला असा कारभार-राहुल खोडसे
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण हे लातूर बीड धाराशिव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे धरण असून याच धरणाला आज पाणी कमी राहिल्याने या धरणावर कोणीही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसतो तेथील संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली असून तेथे लाईटचा अभाव सी सी टीव्ही धुळखात पडलेले दिसून येत आहेत त्यामुळे धरणाची सुरक्षितता पूर्ण धोक्यात आलेली असून धरण वाऱ्यावर सोडून लातूरला बड्या अधिकाऱ्यांची हुजरेगिरी करतात कि काय असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी उपस्थित केला आहे.
लातूर बीड धाराशिव जिल्ह्यातील सिंचन तसेच अंबाजोगाई केज धारूर सह कळंब शिराढोण मुरुड हे मोठी शहरे तर १०० ते १५० गावांना पाणीपुरवठा करणारे एकमेव धरण असून हेच धरण २०१६ मध्ये ज्यावेळी दुष्काळात कोरडे पडले असता लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला होता याच धरणाची संपूर्ण देखभाल व सर्व अधिकार हा लातूरला असल्यामुळे धरणाची अवस्था खूप बिकट झालेली आहे धरण बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर आणि त्यावर नियंत्रण मात्र लातूर जिल्ह्याचे त्यामुळे प्रशासन आणि सरकारने या धरणाकडे गंभीर्याने लक्ष घालून धरणाचे पूर्ण अधिकार हे बीड जिल्हा प्रशासनाकडे द्यावेत म्हणजे इथल्या प्रशासनाचा या धरणावर लक्ष राहील त्यामुळे यावर लवकरात लवकर यावर उपाययोजना करून धरणावरील भोंगळ कारभार बंद करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे राहुल खोडसे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.





















