आमदार सुरेश आण्णा धस यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर!
बीड/प्रतिनिधी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाडा सेवा संघातर्फे यंदाचा मराठवाडा भूषण पुरस्कार आमदार सुरेश आण्णा धस यांना जाहीर करण्यात आला आहे. पुणे येथे मराठवाडा सेवा संघाचे निळकंठ शेळके पाटील आणि राहुल नागरगोजे यांनी ही माहिती दिली.मराठवाडा सेवा संघ दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करते. आमदार सुरेशआण्णा धस यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.निळकंठ शेळके पाटील म्हणाले, “आमदार सुरेश धस यांनी मराठवाड्याच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे.” राहुल नागरगोजे यांनीही धस यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत या पुरस्कारामुळे मराठवाड्यातील जनतेला प्रेरणा मिळेल, असे सांगितले.हा पुरस्कार पुणे येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असून, यावेळी मराठवाड्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मराठवाडा सेवा संघाने सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.





















