सकल मराठा परिवार चा वर्धापन दिन उत्साहात साजरा!
बीड/ प्रतिनिधी
शैक्षणिक, वैद्यकीय,कृषी व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या व महाराष्ट्र स्तरावर काम करणाऱ्या ‘ सकल मराठा परिवारचा’ ४ था वर्धापन दिन, बीड येथे आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या जिल्हा व तालुका समन्वयकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.सदर कार्यक्रमात वकील, डॉक्टर, प्राध्यापक/शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पुजन करून आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले समन्वयक रिकाम्या हाताने न येता त्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागातील गरजूंना संसारोपयोगी वस्तू वाटप केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.दुसऱ्या सत्रामध्ये संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी विचारमंथन झाले व सोबतच वर्षभरातील आजपर्यंतच्या वाटचालीचे सिंहावलोकन केले गेले हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा असलेल्या ‘ सकल मराठा परिवार टीम-बीड ‘ चे सर्वांनी कौतुक केले व असेच शाश्वत काम उभे करण्यासाठी, वाढवण्यासाठी महाराष्ट्रातून आलेल्या मराठा समन्वयकांना शुभेच्छा दिल्या आहेत.





















