शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता फिरतोच कसा, हेच बघतो/ 2 नोव्हेंबरला अंतरवली सराटीत बैठक – मनोज दादा जरांगे पाटील
संपादकीय/रोहन गलांडे पाटील
आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकरीप्रश्नांवर मोठं आंदोलन उभे करण्याची तयारी सुरु केली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला असून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता रस्त्यावर कसा फिरतो, हेच पाहतो, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जरांगे पाटलांनी सांगितले की, येत्या 2 नोव्हेंबर रोजी अंतरवली सराटीत शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, अभ्यासक आणि तज्ञ यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतीमालाला भाव आणि शेतकरी स्वावलंबन या विषयांवर सविस्तर चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांसाठी आम्ही इमानदारीने लढाई लढू आणि ती जिंकू. हे आंदोलन ऐतिहासिक असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले.





















