Homeताज्या बातम्यावाल्मिक कराडची आठवण काढणारा धनंजय मुंडे नीच माणूस;फडणवीस, पवारांचे डोळे उघडतील का?...

वाल्मिक कराडची आठवण काढणारा धनंजय मुंडे नीच माणूस;फडणवीस, पवारांचे डोळे उघडतील का? मनोज जरांगें पाटील यांनी केला प्रश्न उपस्थित?

जालना/प्रतिनिधी

परळीमध्ये आयोजित एका प्रचारसभेमध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे. जगतमित्र हे कार्यालय सर्वांसाठी खुलं असायचं, आताही हे कार्यालय सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. काही असेल नसेल, जगतमित्र कार्यालयामधून आपण गोरगरिबांना मदत करायचो, कार्यालय सुरू आहे, गोरगरिबांना मदत सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे धनंजय मुंडे असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस नाही,  संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धनंजय मुंडे इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो,  जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचं समर्थन कधीच करू नये. अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजूनही अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरे होईल.  गोरे गरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं? अस थेट सवालच आता मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत, गुंडागर्दी, भ्रष्टाचार करणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळून, ब्लॅकमेल करून  आपला संसार उभा करणे, असे भयंकर पाप कराड करत होता, आणि धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते,  असा माणूस अजिबात चांगला नाही, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत,  नाहीतर तुम्हीसुद्ध धनंजय मुंडे यांच्या पापात खाक होताल, अशा इशाराच आता जरांगे पाटील यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!