माजी सरपंच सुनील बापू देशमुख चिंचोली माळी पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या उतरणार मैदानात!
केज /प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी गणातील प्रमुख्याने नागरिकांचे प्रश्न तालुका ठिकाणीच असतात,पंचायत समिती च्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवता येतील या धोरणाने चिंचोली माळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार.चिंचोली माळी जिल्हा परिषद गटामध्ये गेली कित्येक वर्ष जनहिताची कामे करून लोकांच्या संपर्कात असलेले माजी सरपंच सुनील बापू देशमुख चिंचोली माळी जिल्हा परिषद गटातील चिंचोली माळी पंचायत समिती गणातून निवडणूक लढणार असल्याचे समजले जात आहे.सदैव नागरिकांच्या सुख दुःखात अडीअडचणीत सुनील बापू देशमुख हे उपलब्ध होते.नागरिकांचे प्रमुख प्रश्न,अडचणी,कामे हे तालुक्यातील पंचायत समिती,तहसील,कृषी कार्यालय,दवाखाना याच ठिकाणी प्रमुख्याने असतात,पंचायत समिती च्या माध्यमातून तालुका स्थरावर नागरिकांचे प्रश्न सोडवता येईल हा विचार करत तसेच सुनील बापु देशमुख यांचे सहकारी मित्र,मार्गदर्शक व नागरिकांसोबत चर्चा करून चिंचोली माळी पंचायत समिती गणातून स्वतःहा लढण्याचा निर्णय सुनील बापू देशमुख घेणार आहेत.चिंचोली माळी पंचायत समिती गणातील माय बाप जनतेने माझ्या पाठीशी उभा राहावे असे आवाहन सुनील बापू देशमुख यांनी केले आहे.





















