मस्साजोग येथे कै.संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाधान महाराज शर्मा यांच्या किर्तनाचे आयोजन !
केज/ प्रतिनिधी
केज तालुक्यातील मस्साजोग येथे कै.संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमीत्त शनिवारी दि.२९ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध कथा व किर्तनकार भावरत्न गुरुदास ह.भ.प.समाधान महाराज शर्मा केज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाचे आयोजन महादेव मंदिर,शेजारी मस्साजोग येथे करण्यात आले आहे.सकाळी १० ते १२ या वेळेत सुप्रसिद्ध कथाकार,कीर्तनकार भावरत्न,गुरुदास ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन होणार असून पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. पंडितराव देशमुख,श्री. धनंजय देशमुख तसेच चि.विराज संतोष देशमुख यांनी केले आहे.





















