मराठवाड्यातील सर्वच जागा धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाण लढविणार/केज तालुक्यातील जागासाठी २८ नोव्हेंबरला पत्रकार परिषद – बाळराजे आवारे पाटील
केज/प्रतिनिधी
धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुक होवू घातल्या आहेत. मराठवाड्यातील नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका सर्व सामान्य व शेतकऱ्यांच्या हितासाठी लढविणार असल्याची घोषणा प्रतिष्ठाणचे संस्थापक बाळराजे आवारे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.तसेच केज तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा निश्चित करण्यासाठी केज येथील शासकीय विश्रामगृह येथे २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे असे बाळराजे आवारे पाटील यांनी म्हटले आहे.मराठवाड्यातील सर्व सामान्य व शेतकरी यांच्या समस्याकडे सत्ताधारी व विरोधाकडून तसेच सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व सामान्य व शेतकरी अनेक समस्यामुळे अडचणीत सापडला आहे. या समस्या सोडविण्यासाठी आगामी होवू घातलेल्या स्वराज संस्थेच्या निवडणुकी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाणच्यावतीने लढविणार येणार असल्याचे बाळराजे आवारे पाटील यांनी सांगितले.





















