Homeताज्या बातम्यानशेच्या गोळ्या विक्री प्रकरण; मेडिकल चालकासह दोघांना अटक/बीड शहर डी बी पोलिसांची...

नशेच्या गोळ्या विक्री प्रकरण; मेडिकल चालकासह दोघांना अटक/बीड शहर डी बी पोलिसांची कामगिरी!

बीड/प्रतिनिधी

नशेसाठी गोळ्या व औषधांची विक्री करणाऱ्या दोन जणांना बीड शहर पोलिसांनी तपसात अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मेडिकल चालक व त्याला पुरवठा करणारा तरुण यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांनी नशाखोरी आणि त्यापाठीमागील गुन्हेगार यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. बीड शहर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला हाेता. या प्रकरणात चार जणांना तेव्हा अटक केली होती. त्यांच्याकडून अल्फ्राझोलम गोळ्या आणि कोडीन सायरपसह एकूण सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. सध्या हे चारही आरोपी कारागृहात आहेत. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना शेख फारुक शेख आरेफ (रा. इस्मालमपूरा, बीड) या मेडिकल चालकाने या गोळ्यांची विक्री केल्याचे समोर आले होते. त्याला पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकशीत त्याला इनामदार मोहम्मद तारीखोद्दीन मोहम्मद नुरुद्दीन (रा. शहेंशाहर नगर) या गोळ्या पुरवठा केल्याचे समोर आले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ६ झाली आहे. सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक श्री नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक श्री सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शन प्रमाणे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,सपोनी बाबा राठोड, पोलिस अंमलदार सचिन अलगट, संजय राठोड, गहिनीनाथ बावनकर, राम पवार, यांनी केली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!