चिंचोली (माळी) सर्कल ओबीसी महिला गटातून सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश देशमुख (माजी सैनिक) यांच्या पत्नी सौ. सुजाता देशमुख या जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून जोरदार चर्चेत !
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिचोंली माळी जिल्हा परिषद महिला ओबीसी गटातून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या व भारतीय सैन्य दलात काम केलेले आणि आता सामाजिक कार्यात वाहून घेतलेले श्री व्यंकटेश ज्ञानोबा देशमुख (माजी सैनिक) यांच्या पत्नी ज्या महिला कल्याणासाठी तसेच सर्वसामान्य शेतकरी, कामगार व मजुरांच्या कल्याणासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून सतत कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुजाता व्यंकटेश देशमुख या नवीन चेहऱ्याला सर्वत्र पसंती दिसत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जनतेला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या व देशसेवा आणि समाजसेवेचा वारसा असलेल्या भूमिपुत्राला संधी मिळाली पाहिजे या भावनेतून सौ. सुजाता व्यंकटेश देशमुख यांच्या नावाला त्यांच्या मनातील उमेदवार म्हणून सर्वत्र प्राधान्याने पसंती मिळत आहे. सौ सुजाता व्यंकटेश देशमुख यांचे सासरे श्री ज्ञानोबा देशमुख यांनी देखील भारतीय सैन्य दलात नोकरी करून देश सेवेचे महान व गौरवशाली कार्य केले आहे. तसेच पुढे त्यांचे पती श्री व्यंकटेश देशमुख यांनी ही आपल्या वडिलांचा देश सेवेचा गौरवशाली वारसा पुढे चालविला. त्यांनी ही भारतीय सैन्य दलात बावीस वर्ष अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे गौरवशाली देशसेवा केली असून आता सेवानिवृत्तीनंतर मागील तीन वर्षापासून सर्वसामान्य गोरगरीब, शेतकरी, कामगार, मजूर, विद्यार्थी इत्यादी च्या कल्याणासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून दोघे पती-पत्नी गरजूंना वेळोवेळी सहकार्य, मदत तसेच मार्गदर्शन करत आहेत.“वसा देश सेवेचा, आता समाज सेवेचा”ही निष्ठा मनात बाळगून या दांपत्याने मागील तीन वर्षा पासून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत.एम.पी.एस.सी. सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न असो किंवा त्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असो किंवा पुण्यासारख्या ठिकाणी त्यांच्या निवासाचा अथवा महाविद्यालयातील प्रवेशाचा प्रश्न असो त्यांनी आपल्या समाज बांधवांना बरोबर घेऊन संबंधिताकडे किंवा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून मंत्री महोदयांना भेटून नियमानुसार गरजूंना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.विशेष म्हणजे ज्ञानपुष्प मैत्री फाऊंडेशन च्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे त्यांचे पती श्री व्यंकटेश देशमुख यांच्या सहकार्याने व मदतीने फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत अतीवृष्टी भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करून गोरगरीब जनतेसाठी व शेतकरी बांधवांनसाठी मोफत किराणा कीट वाटप असो किंवा गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असो किंवा रक्तदान शिबिराचे आयोजन करणे असो यासारखे विविध उपक्रम राबवून गरजूंना सतत मदतीचा हात पुढे केला आहे. सौ. सुजाता व्यंकटेश देशमुख या पदवीधर असून तसेच त्यांचे पती व्यंकटेश देशमुख हे ही उच्च शिक्षित बी.एससी. बी.एड. आहेत. सेवानिवृत्तीनंतरही कायद्याचे ज्ञान असावे म्हणून ते सध्या कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी एल.एल.बी. करत आहेत. त्यांनी भारतीय सेनेत सेवा देत असताना देखील आपली शैक्षणिक कारकीर्द सतत चालूच ठेवून बी.एस्सी. पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून तर बी.ए.पदवी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून तसेच बी.एड.बर्कतुल्ला विद्यापीठ संलग्नित मिलिटरी कॉलेजमधून पूर्ण केले आहे. अशा एकंदरीत सुशिक्षित व देश सेवेसाठी जीवन समर्पित केलेल्या कुटुंबातून आल्यामुळे देशसेवा व समाजसेवा त्यांच्या रक्तात भिनलेली आहे.सौ सुजाता व्यंकटेश देशमुख या केज तालुक्यातील वरपगावच्या रहिवासी असून त्यांच्या पतींनी समाजसेवक व उद्योजक म्हणून केज तालुका व पुणे शहरात देखील आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.त्यामुळे सध्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये महिला ओबीसी गटातील एक प्रभावी उमेदवार म्हणून सौ सुजाता व्यंकटेश देशमुख यांचे नाव खूप चर्चेत आहे. सुशिक्षित, सामाजिक जान असलेले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारे निर्विवाद नवीन उमेदवार म्हणून त्यांचे नाव सर्वांच्या तोंडी येत आहे.त्यांनी दोघांनीही जनसेवेसाठी पुढे यावे व त्यांच्या माध्यमातून चिंचोली (माळी) सर्कलचा सर्वांगीण व चौफेर विकास व्हावा अशी जनसामान्याची भावना आहे.





















