आ. तानाजी सावंत यांच्या स्व खर्चातून शेत रस्ता !
परांडा प्रतिनिधी -जोतिराम घोगरे
परांडा -भूम -वाशी विधानसभा मतदार संघांचे विकासप्रिय आमदार माजी आरोग्य मंत्री मा. तानाजी सावंत साहेब यांच्या स्व खर्चातून कौडगाव येथील कारंडे वस्ती ते डोनजा येथील घोगरे वस्ती या शेत रस्त्याचे काम चालू करण्यात आले. कारंडे वस्ती ते घोगरे वस्ती या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना, विध्यार्थी, रुग्ण यांना रस्त्यावर असणारे पाणी, चिखल यामुळे वावरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर आमदार साहेबांनी स्वखर्चातून कामाला सुरवात केली.यावेळी मा. पंचायत समिती सदस्य तथा डोनजा ग्रामपंचायत मा. सरपंच गजेंद्र सूर्यवंशी, मुकादम बापू सूर्यवंशी, रामदास कारंडे,सुरेश घोगरे, अमोल गुळवे, महादेव घोगरे, नामदेव गुळवे, जनक सूर्यवंशी,भाऊसाहेब घोगरे, बालाजी घोगरे,डॉ दत्तात्रय कारंडे आदी उपस्थित होते..





















