अंबाजोगाई विकास करण्यासाठी,लोकविकास महाआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा !
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक 2025 च्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांची अंबाजोगाईत भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेला अंबाजोगाईकरांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद मला मनापासून भावला. जनतेच्या डोळ्यातील विश्वास आणि विकासाची आतुरता स्पष्ट दिसत होती.अठरापगड जाती-धर्मातील सर्व समाज बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून मला दिलेलं ममत्व, साथ आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. सर्वांना सोबत घेऊन, भेदभाव न करता, विकासाच्या प्रवासात सहभागी करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे आणि तो पुढेही कायम राहील.गेल्या 30 वर्षांपासून अंबाजोगाईकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास हीच माझ्या कामाची खरी पावती आहे आणि पुढेही अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. अंबाजोगाईच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळ असणाऱ्या प्रत्येकाला जपण्याचा मी प्रयत्न केला आणि पुढेही तीच भूमिका प्रामाणिकपणे बजावणार आहे.अजित दादांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई शहरासाठी जे काही चांगलं आणि भरीव काम करता येईल ते करण्याची संधी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बारामतीच्या धर्तीवर अंबाजोगाईचा विकास व्हावा यासाठी दादांना आम्ही विनंती केली असून या प्रवासात आम्हाला त्यांची ताकद लाभेल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.सभेत बोलताना अजितदादांनी अंबाजोगाईचा वेगवान विकास करायचा असेल तर लोकविकास महाआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा, निधी देण्यात कुठेही कमी पडणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले. अंबाजोगाईकरांच्या विश्वासाबरोबर राज्याच्या नेतृत्वाची ही साथ मिळाल्यावर अंबाजोगाईचे भविष्य उज्ज्वलच असेल हे आज अधिक ठामपणे जाणवत आहे.अंबाजोगाईसाठी शक्तिशाली नेतृत्व आणि सक्षम दृष्टी आवश्यक आहे.आणि आज दादांच्या भाषणातून जाणवले की अंबाजोगाईला विकासाच्या नव्या पर्वाकडे नेण्याची खरी इच्छा त्यांच्या मनात आहे. त्यांच्या अनुभवातून, मार्गदर्शनातून आणि विकासाभिमुख विचारातून अंबाजोगाईला नक्कीच नवी उंची मिळेल, आणि त्या कार्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनं तयार आहोत.





















