अंबाजोगाई येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कार !
बी .टी सेलुकर /अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेला उद्धव ठाकरे गटांचा शिवसेना दसरा मेळावा या मेळाव्यासाठी संबंध महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते त्याचाच एक भाग म्हणून आंबेजोगाई तालुक्यातून उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक माननीय मदनराव परदेशी अशोकराव गाढवे सुंदर अवताडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दसरा मेळाव्यास हजर होते या मेळाव्यामध्ये प्रसार माध्यमासी बोलताना मदनराव परदेशी यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पावसामुळेझालेली दयनीय अवस्था प्रसार माध्यमातून पोट तिडकीने मांडली त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी ही मागणी लावून धरली मदनलाल परदेशी यांनी प्रसार माध्यमातून मांडलेली भूमिका संबंध महाराष्ट्रात गाजली असून त्यांचे त्याबद्दल सर्व सरातून कौतुक व अभिनंदन होत आहे मेळाव्याहून परत आंबेजोगाई ला आल्यानंतर ममदापूरचे सरपंच वसंतराव शिंदे यांनी मदनराव परदेशी सिलुंबा येथील कार्यकर्ते सुंदरराव अवताडे अशोकराव गाढवे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी पंचायत समितीचे सदस्य कल्याणराव भिसे व सुधाकर शिंदे सुखदेव धोत्रे इत्यादी मंडळी हजर होती .





















