Homeताज्या बातम्यासिद्धार्थ नगरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त स्पर्धांचे आयोजन /विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रोख...

सिद्धार्थ नगरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त स्पर्धांचे आयोजन /विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रोख पारितोषिक वितरण!

बदापुर/प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष श्री अक्षय प्रमोद खरटमोल आणि कॅशियर श्री तुषार दयानंद साठे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक प्रशंसनीय उपक्रम राबवला.या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी शैक्षणिक साहित्य व रोख रक्कम स्वरूपात पारितोषिक देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती.जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सिद्धार्थ नगर, अंबाजोगाई ही संस्था गेली 15 ते 20 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रीय आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 2022-23 या वर्षी या संस्थेला प्रतिष्ठेचा ‘शाहू-फुले-आंबेडकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.या उपक्रमात आणखी एक सामाजिक जाणीव असलेली गोष्ट घडली – उपाध्यक्ष अक्षय खरटमोल यांनी आपला वाढदिवस धायगुडा पिंपळा येथील ‘भक्तीप्रेम वृद्धाश्रम’ येथे स्नेहभोजन देऊन साधेपणाने वाढदिवस साजरा केला. कुटुंबीयांसह वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक अनोखा आदर्श त्यांनी उभा केला.या उपक्रमाबाबत जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रमुख अविनाश साठे म्हणाले, “आमच्या कार्याचा परिणाम आज अशा तरुणांच्या कृतीतून दिसत आहे. समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची भावना हेच आमच्या कार्याचे यश आहे. युवकांनी अशा पद्धतीने सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा आहे.”अशा सकारात्मक उपक्रमांमुळे समाजात आशेचा नवा किरण निर्माण होतो आहे. युवकांनी सामाजिक जाणिवेतून उभारलेले हे उपक्रम समाजासाठी नवा आदर्श घालून देणारे ठरत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!