समृद्ध पंचायत राज्य अभियान योजना तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न् व ग्रामसभेचे आयोजन!
कळंब( तालुका प्रतिनिधी:- तोफिक मोमीन)
कळंब :- तालुक्यातील गौर या ठिकाणी मौजे गौर तालुका कळंब येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना अंतर्गत तालुका स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी या श्री कैलास घाडगे पाटील विधान सभा सदस्य धाराशिव कळंब यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची शब्द दिला तसेच मा श्री गटविकास अधिकारी विनोद जाधव यांनी अभियान प्रश्न प्रत्रिका कालावधीत विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले त्याबद्दल या अभियानात सहभागी सर्व नागरिकांनी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी सय्यद सर तालुका महिला बालकल्याण अधिकारी श्रीमती थोरात मॅडम, उप अभियंता पाणी पुरवठा श्री दत्तात्रेय पाचगे, तालुका व्यवस्थापक श्री अलंकार बनसोडे, समाधान जोगदंड जिल्हा व्यवस्थापक , पशुसंवर्धन तालुका पवार, विस्तार अधिकारी श्री साळुंके दत्तात्रय, विस्तार अधिकारी श्री हनुमंत झांबरे, सरपंच श्रीमती सुषमा देशमुख उपसरपंच श्रीमती रामेश्वरी लंगडे, माझी प सर सदस्य श्रीमती इंदुमती माने,तात्यासाहेब देशमुख,शाम देशमुख मुकुंद देशमुख, प्रभाकर लंगडे जगन्नाथ माळी नामदेव केसरे विश्वजीत देशमुख ग्राम संघ अध्यक्ष सचिव सि आर पी अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ती तसेच महिला गुणवंत सोनवणे, सय्यद सर,शिवहार घौगडे, अनेक नागरिक, महिला विविध पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामसभा यशस्वी झाली .





















