शिवनेरी गडाची माती कपाळाला लाऊन संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना !
संपादकीय/रोहन गलांडे
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सरकारकडून जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. मात्र, जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे बघायला मिळतंय.ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. हैदराबाद गझेटियर लागू करा. 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.तरी या मागणीसाठी शिवनेरी गडाची माती कपाळाला लाऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.





















