वार्ड १८ अ मधून संपादक इमाद इनामदार यांची उमेदवारी जाहीर !
बीड /प्रतिनिधी
वार्ड क्रमांक 18 ‘अ’ मधून स्थानिक जनता, वाचकवर्ग आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने संपादक इमाद इनामदार यांनी अधिकृतपणे आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. “निस्वार्थ सेवाच माझी ओळख” या वाक्यातून त्यांनी आपल्या कार्यशैलीचा स्पष्ट परिचय देत मतदारांशी भावनिक नाळ जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.इमाद इनामदार हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असून विविध सार्वजनिक कामांमध्ये सक्रिय योगदान देत आले आहेत. जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, परिसरातील मूलभूत सुविधांवर सातत्याने पाठपुरावा करणे आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारणे—ही त्यांची ओळख निर्माण करणारी कामे म्हणून स्थानिक नागरिक त्यांना ओळखतात.उमेदवारी जाहीर करताना त्यांनी म्हटले“आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी वार्ड क्रमांक 18 अ मधून निवडणूक लढत आहे. निस्वार्थ सेवाच माझी ओळख आहे. आपल्या सहकार्याच्या बळावर मी लढत आहे. आपला एकमताचा पाठिंबा माझ्यासाठी अमूल्य आहे.वार्डमधील अनेक तरुण, वाचक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी रंगत आणेल, अशी चर्चा जनतेत सुरु आहे. स्थानिक प्रश्नांवरील त्यांचे स्पष्ट भूमिका, पारदर्शक कार्यपद्धती आणि सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेमुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.येत्या काही दिवसांत प्रचार मोहीमेची गती वाढवून मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. वार्ड 18 अ मधील निवडणूक नेमकी कोणत्या दिशेने वळते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





















