लातुर मध्ये आ.धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला शौचालयाला चिटकवत जोडे मारो आंदोलन करत केला निषेध व्यक्त !
लातुर/प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कटामागे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे सांगितले जात असल्याने, लातुर मध्ये त्यांच निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने मुंडे यांच्या पोस्टरला शौचालयाला चिटकवत जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे .या विषयी सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी कटामागे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे सांगितले जात असल्याने, लातुर मध्ये त्याचा निषेध व्यक्त करत सकल मराठा समाजाच्या वतीने मुंडे यांच्या पोस्टरला शौचालयाला चिटकवत जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे .





















