राज्य व केंद्र सरकारने तात्काळ सोयाबीन ची खरेदी सुरू करावी:-श्री गायके राजू
बीड/प्रतिनिधी
ऑक्टोबर आज बाजारामध्ये सोयाबीनची खरेदी 3500 ते 4000 रु. पर्यंत केली जाते आणि शासनाचा हमीभाव 5328 रु. आहे. शेतकऱ्यांना जवळपास 1528 ते 1828 एवढा तोटा सहन करावा लागतो. अतिवृष्टी आणि महापुरातून जे काही सोयाबीन वाचलेल आहे त्या सोयाबीनची केंद्र व राज्य सरकारने तात्काळ खरेदी सुरू करावी. शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे त्याला वाचवायचा असेल तर लवकरात लवकर शासनाने सोयाबीनची खरेदी करावी नसता स्वाभिमानी शेतकरी संघटना पालकमंत्र्याला आणि जिल्हाधिकाऱ्यांना तोंड कशी पाडल्याशिवाय राहणार नाही याची सरकारला जाण आहे. जर आठ दिवसाच्या आत सोयाबीनची खरेदी सुरू न झाल्यास पालकमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजू शेट्टी साहेब यांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री राजू गायके, जिल्हाध्यक्ष श्री श्रीनिवास भोसले, युवा जिल्हाध्यक्ष श्री दिनकर रिंगणे उपविभाजिल्हाध्यक्ष शेख खिजर, जयदेव शिंगणे उपजिल्हाध्यक्ष श्री प्रदीप गायके गेवराई तालुका अध्यक्ष श्री विलास खिसाडे अधिक कार्यकर्त्यांनी आव्हान केले आहे.





















