मुख्यमंत्री-कृषी मंत्री जागे व्हा! तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्या./”शेतकऱ्यांचा जीव धोक्यात – सरकार झोपेत, विद्यार्थी काँग्रेसची आक्रमक भूमिका!
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा. सतत गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे या पावसाने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाने शेतात आजही पाणी साचून शेतातील पीक पूर्णपणे कुजत आहे. नदीकाठावरील शेती तर पूर्णपणे खरडून गेली आहेत. शेतकर्यांच्या तोंडचा घास निघून गेला आहे, शेतकर्यांनी जगावं कसं, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विद्यार्थी काँग्रेस बीड यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने हजेरी लागली आहे. या झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन, कांदा, बाजरी, कपासी इतर तरकारी पिकांमध्ये पाणी साठल्याने ही पिके पाण्यात बुडालेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना लाखोंचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाल्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात अधिक भर म्हणजे बाजारपेठेमध्ये दर कोसळल्याने शेतकर्यांना पावसाचा व दरांचा असा दुहेरी फटका बसत आहे. सोयाबीन पिकामध्ये पाणी साठल्याने सोयाबीन खराब होऊन कीड लागून खराब झाली आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामा वर मोठे संकट ओढवले असून शेतकरी अक्षरशः कमरे एवढे पाण्यात आहेत ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला म्हणजे ती अतिवृष्टी झाली. इथे एका दिवसात १९८ मि.मी. पावसाची नोंद बीड जिल्ह्यात झाली आहे. पावसाने अक्षरशः सर्व पिके उद्ध्वस्त करून टाकले आहेत. सोयाबीनला कोंब फुटत आहेत, कापूस झोपला आहे, त्याची वाढ खुंटली, उत्पादन घटले, कांदा उद्ध्वस्त झाला, ऊस अक्षरशः झोपला, अन्य पिकं आणि पाल्याभाज्या सडून गेल्या. “सरसकट नुकसानभरपाई द्या अन्यथा जनतेचा संताप सरकारला चाखावा लागेल ही भयावह स्थिती आहे बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतातल्या शेतकऱ्याची. आता पंचनाम्याचे तुणतुणे वाजवायला नको, कागदपत्रांचे खेळ खेळायला नको, बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, ओल्या दुष्काळातल्या सर्व मदती बीड जिल्ह्यातल्या शेतकन्यांना सरसकट देऊन टाका, बीड जिल्ह्यातल्या सर्वच आमदार, खासदारांनी ओल्या दुष्काळाची मागणी केली आहे. आता सरकार मायबापाने बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे अश्रू खरचं पुसायचे असते तर जिल्हावासियांना सरसकट मदतीची नितांत गरज आहे. या सर्व परिस्थितीची जाणून घेत विद्यार्थी काँग्रेस बीड जिल्हा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे निवेदन देऊन मागणी केली यावेळी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवराज शिरसट पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य थोटे, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष निखिल भिसे व अन्य विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





















