बीडीओ केज पंचायत समितीच्या घरकुल विभागाची लाचलुचपत बंद कधी होणार? गोरगरीबाचे मुंडके मोडुन वयक्तीक लाभ परवडेल का?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील ११३ ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सरपंच घरकुल योजनेच्या वयक्तीक लाभ गावातील नागरिकांना देण्यासाठी हजारो रूपये मागत असल्याचे समजले जात आहे मग हे पैसे नेमके ग्रामपंचायत सरपंचाला, ग्रामसेवककाला, इंजिनिअरला का बिडीओ यांना दिले जातात असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण ११३ ग्रामपंचायत मध्ये घरकुल योजनेसाठी गोळा केले जातात मग पैसे नेमके जातात कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ११३ ग्रामपंचायत २००० हजार रुपये प्रेत्येकी नागरिकांन कडून पैसे गोळा करत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात लाच घेऊन पैसे ही लाच नेमकी कोणत्या निर्लज्ज अधिकारी, कर्मचाऱ्यांना दीली जाते.गोरगरीब नागरिकांन कडून घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी घेतलेले दोन – हजार वाटेल तसे पैसे गोळा केले जात आहेत परंतु यावर कुणी लक्ष घालायला तयार नाहीत तसेच गोरगरीब जनतेचे मुंडके मोडुन वयक्तीक लाभ शासनाने द्यायला सांगितले आहे का त्यामुळे बीडीओ यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.





















