बीडकरांनी केला पक्का निर्धार, सुसंस्कृत आणि निष्कलंक उमेदवार हाच एकमेव पर्याय /पत्रकार राजू जोगदंड यांच्या पत्नी सुषमा जोगदंड यांना नगराध्यक्ष करण्यासाठी बीडकर करु लागले संकल्प !
बीड / प्रतिनिधी
प्रश्न आमचे आणि समाधान प्रस्थापीत लोकच करु शकतात अशी बहुजन समाजाची आजवरची भावना झाली होती. परंतू वारंवार सत्ता देऊनही बहुजनांचे कल्याण सोडा तर त्यांचे गल्लतील साधे-साधे प्रश्नही आजवर सुटले नाहीत. त्यामुळे आज शहरातील वार्डा-वार्डातील सर्व सामान्य जनता त्रस्त असून अनेक समस्यांशी त्यांना नित्याची झुंज द्यावी लागत आहे, परंतू आत्ता बस्स झाले. प्रश्न आमचे आत्ता समाधन देखील आम्हीच करणार असा बीडकरांनी पक्का निर्धार केला असून सुसंस्कृत आणि निष्कलंक उमेदवार हाच एकमेव पर्याय म्हणून बीडकरांना अनुभवायाला येणारे प्रश्न तळमळीने सोडविण्यासाठी सायं. दैनिक दृष्टीकोन न्यूजचे संपादक अजय उर्फ राजू जोगदंड यांच्या पत्नी सुषमा अजय जोगदंड यांना नगराध्यक्ष करण्यासाठी बीडकर संकल्प करु लागल्याचे चित्र पहायाला मिळत असून तशी चर्चा देखील शहरातील वार्डा-वार्डात होऊ लागली आहे.बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपद हे पहिल्यांदाच अनुसूचित जाती महिला प्रर्वगासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस सामान्यांच्या मुलभूत प्रश्नांची जाण व त्याची सोडवणूक करण्याची धमक असलेलं सक्षम नेतृत्व म्हणून आजवर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्यांचा आवाज बनून सायं. दैनिक दृष्टीकोन न्यूजचे संपादक अजय उर्फ राजू जोगदंड यांनी आपल्या प्रखड लेखणीतून शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. पैश्यासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा करणार्यांना तगड आव्हान देण्यासाठी बीड शहरातील नागरिकांनी पत्रकार अजय उर्फ राजू जोगदंड यांच्या पत्नी सुषमा अजय जोगदंड यांना बीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून निवडणुक लढविण्यासाठी बहुजन समाज एकमुखाने आग्रह करु लागला आहे. त्यामुळे बहुजनांशी नाळ जोडून असलेले पत्रकार राजू जोगदंड व त्यांच्या सौभाग्यवती सुषमा अजय उर्फ राजू जोगदंड यांनीही समाजाचा आग्रह लक्षात घेता व पती अजय उर्फ राजू जोगदंड यांचे सामाजिक कार्य आणि समाजाप्रती असलेली तळमळ पाहुन त्यांना आपल्या वैवाहिक जिवनापासून गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने आजतगायत सुख-दु:खाच्या संकाटात साथ देऊन बहुजनांच्या भल्यासाठी साथ सहयोग दिला. बहुजन समाजाचे दु:ख दुर करण्यासाठी संकटांशी झुंज देण्यासाठी व समाजाच्या आग्रहामुळे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सुषमा अजय उर्फ राजू जोगदंड यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून त्यांच्या विजयासाठी बीडकरांनी देखील संकल्प करत सुसंस्कृत आणि निष्कलंक उमेदवार हाच पत्रकार राजू जोगदंड यांच्या पत्नी सुषमा जोगदंड एकमेव पर्याय असून प्रश्न आमचे आत्ता समाधान देखील आम्हीच करणार म्हणून बीडकरांनी चंग बांधल्याचे बोलले जाऊ लागल्याने प्रस्थापीतांची मात्र घाबरगुंडी उडाली असल्याचे चर्चा वार्डा-वार्डात होत असून बहुजनांनी समता-बंधुभाव आणि न्याय प्रस्थापीत करण्यासाठी सुषमा अजय उर्फ राजू जोगदंड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने प्रस्थापीत पक्षांसह त्यांच्या तकलादू उमेदवारांची पाचावर धारण बसली आहे.
चौकट :
बहुजन मुक्ती पार्टी कडून निवडणूक लढविण्याची समाजातून मागणी राष्ट्रीय स्तरावर देशातील बहुजन समाजाचे प्रश्न मांडून एससी, एसटी, ओबीसी व अल्प संख्याक समाजा च्या हक्क अधिकारासाठी अहोरात्र झाटणारी एकमेव पार्टी म्हणून बहुजन मुक्ती पार्टीला समाज मान्यता मिळाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील पार्टीच्या माध्यमातून बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडणूक सुषमा अजय उर्फ राजू जोगदंड यांनी लढाववावी व समस्त बहुजन समाजाला आणि बीडकरांना राष्ट्रीय स्तरावर न्याय मिळवून देण्याची जोरदार मागणी तमाम बहुजन समाजासह बीडकरांमधून होतं आहे.





















