पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी अडथळा निर्माण /तलाठ्याची केज तहसीलदारकडे तक्रार!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे बनकरंजा येथील अमोल थोरात नावाच्या शेतकऱ्यांची बैलजोडो व गाय म्हस नदीच्या पाण्याच्या पुरामध्ये बाहुन गेली असुन त्याचा पंचनामा करण्यासाठी चंदनसावरगाव चे तलाठी हे टाळाटाळ करुन मला आर्थीक मदत मिळण्यासाठी अडथळा निर्माण करत असल्याचे केज तहसीलदार यांच्या तक्रार शेतकऱ्यांने दाखल केली आहे या विषयी अर्जाद्वारे सविस्तर वृत्त असे अमोल दिनकर थोरात येथील माझी जमीन मौजे बनकरंजा सर्व नं. 175 मध्ये असून सदर सर्वे नंबर हा उंदरी नदी लगत आहे. विनाक 27/09/2025 रोजी सकाळी 11.00 वाजणेच्या सुमारास भरपुर पाऊस पडल्याने व दोन्ही तळ्याच्या सांडव्यातून भरपूर पाणी आल्याने सदर नदीस पूर आला होतापुरामध्ये माझी बैलजोडी म्हस वाहुन गेले होते. या करीता मी चंदनसावरगाव सज्जाचे तालादी पटाईत साहेब यांना त्यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांचा मोबाईल बंद आसल्याने संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे मी तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय केज यांना दिनांक 30/09/2025 रोजी स्पॉट पंचनामा करणे कामी लेखी अर्ज दिला होता. परंतु तलाठी सज्जा चंदनसावरगावचे तलाठी पटाईत यांनी आज पर्यंत कसल्याही प्रकारचा पंचनामा केलेला नाही. त्यांना मी अनेक वेळा भेटून त्यांचे मोबाईलवर संपर्क करुन हि त्यांनी जानुन बुजून माझ्याशी बोलण्यास टाळाटाळ करून पंचनामा करणे कामी येत नाहीत. वाहून गेलेल्या माझ्या बैलजोडी, गाय व महेस यांची पशु वैद्यकीय दवाखाणा चंदनसावरगा येथे नोंद आहे तसेच माझे जनावरे पुरामध्ये वाहून जाताना आमचे गावातील संतोष थोरात, नवनाथ थोरात ,युवराज थोरात 4) विलास थोरात. 5) राजकन्या थोरात यांनी प्रत्यक्ष घटना पाहून त्यांनी जनावरे वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु नदीच्या पुरामुळे जनावराला वाचवु शकले नाही तरी तलाठी साहेब पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे शेतकरी अमोल थोरात यांनी म्हटले आहे तरी केज तहसीलदार यांनी न्याय द्यावा अशी अर्जाद्वारे केली आहे.





















