पिककर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावे आलेला पिक विमा व दुष्काळी अनुदानाची तात्काळ रक्कम शेतकऱ्याना द्या /न्याय न मिळाल्यास सामुहिक आत्महत्या करण्याचा विचाराधीन आहे !
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील पिककर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या नावे आलेला पिक विमा व दुष्काळी अनुदानाची तात्काळ रक्कम शेतकऱ्याना द्या न्याय न मिळाल्यास सामुहिक आत्महत्या करण्याचा विचाराधीन आहे सायगाव येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की अंबाजोगाई, जि.बीड येथील पिक कर्ज थकीत शेतकरी यांच्या नावे मंजुर झालेला पिकविमा व अनुदान, पी.एम. किसान योजने अंतर्गत मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना त्याच्या खाते वर देण्यात यावी. बैंक ऑफ इंडिया, शाखा- अंबाजोगाई, हि बँक शेतकऱ्यांच्या नावे खात्यामध्ये जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांना देण्यास मनाई करत आहे. सदर बँक थकीत पिक कर्ज अगोदर भरुन घ्या. तो पर्यंत आम्ही तुम्हाला एक ही रुपये देणार नाही असे सांगत आहे. व होल्ड केलेले बँक खाते त्वरीत चालु करुन देण्यात यावे. शासनाच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी एक वर्षाची मुदत दिलेली असुनही ते आम्हा शेतकऱ्यांना अनुदान पिक कर्ज व इतर रक्कम देण्यास इनकार करत आहेत.तरी आम्हा सर्व शेतकऱ्यांनी विचार केलेला आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आमच्या कडे आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. सद्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला आहे. संबंधीत बँक व बँक मॅनेजर वर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी. तरी मे. साहेबांनी सदर बँकेस शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम त्यांना देण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.





















