नारायण गडावर दसरा मेळाव्याची तयारी जोरात!
संपादकीय/रोहन गलांडे
नारायणगड महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण गड आहे, जो ‘धाकटी पंढरी’ म्हणूनही ओळखला जातो. या गडाची तटबंदी बाळाजी विश्वनाथांच्या कालावधीत सुरू झाली आणि नानासाहेब पेशव्यांच्या काळात पूर्ण झाली. हे ठिकाण धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असून, बीड जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मेळावा घेण्याचा निर्णय घेताच गावागावातील मराठा बांधवांनी मेळाव्याला जाण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे तालुक्यातील प्रत्येक गावात बैठका आयोजित करून मेळाव्याला जाण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. गेलीश्री क्षेत्र नारायणगडावर होणारा पारंपरिक दसरा मेळावा मराठा समाजाला नवी दिशा देणारा मेळावा ठरणार आहे त्यामुळे लाखो संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नारायण गडावर दसरा मेळाव्याची तयारी जोरात सुरू आहे.





















