दुष्ट विचाराचा नेता ओबीसीला लाभला : मनोज जरांगे पाटील
संपादकीय/रोहन गलांडे
विचाराचा नेता ओबीसीला नेता लाभला आहे. वेगळे चॉकलेट देऊन नेते कामाला लावतो, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. त्यांना वाटतं त्याच्यासारखं सगळं चालावं असे जरांगे म्हणाले. आम्ही सर्व लोकशाही मार्गाने करतो असेही जरांगे पाटील म्हणाले. लोकशाही मार्गाने आम्ही आहेत तुला सर्व मिळवणार काय करायचं ते कर अशी टीका जरांगेंनी केली. आम्ही पहिलेच कुणबी ओबीसीच्या यादीत आहोत ओबीसीच्या आरक्षणात आहोत असे जरांगे म्हणाले. १६ टक्के आरक्षण ओबीसीचं ते पण मागे घ्या असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे सुद्धा तणाव होऊ शकतो. आमचं होतं तर आम्ही खाऊ दिलं असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. १८० जातीच्या साडेचारशे जाती कशा झाला? हे सुद्धा सरकारने सांगावं असे जरांगे म्हणाले. मराठा सम ाज पुढारलेला आहे, तो मागस नाही असे भुजबळ म्हणाले होते, त्यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, तू काय कमी पुढारलेला आहेस का? तुझ्या प्रत्येक गावात जमिनी आहेत असे जरांगे म्हणाले. भुजबळांनी गोरगरीब ओबीसींना वेड्यात काढलं आहे. तुला रस्त्यावर उतरु नको केव्हा म्हटलं, तुला जिंदगीत दुसरं काय आलं? असा सवाल जरांगेंनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. आरक्षणासाठी उतरायचं आणि करायचा असेही ते म्हणाले. सरकारने भुजबळांवर गुन्हा दाखल केला पाहिजे.तू म्हणजे मंत्रिमंडळ आहेस का? असेही जरांगे म्हणाले.तुमच्यासारखा मी जातीवादी नाही वाद लावण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी हा कुटाणे करतो, ओबीसींनी शहाणे व्हावे याच्या नादी लागून ओबीसींच वाटोळ करु नये. त्यांना जर आमचं चॅलेंज केलं तर १९९४ चा जीआर आम्ही चॅलेंज करणार असल्याचे जरांगे म्हणाले. आतापर्यंत हजारो कोटी रुपये दिले तेव्हा सारथी तर आता दोन वर्षात आली असे जरांगे म्हणाले. आम्ही म्हटलं का ओबीसी महामंडळाला महाज्योती का दिले म्हणून असे जरांगे म्हणाले. तुमच्यासारख्या मी जातीवादी नाही. तुम्ही उपसमिती बोलावली त्यात एकही मराठा नाही सरळ सरळ जातीवादी आहे हे तुम्हाला दिसलं नाही का? असेही जरांगे म्हणाले.





















