जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत डोणजे विद्यालयाची धडाकेबाज कामगिरी परांडा प्रतिनिधी -जोतिराम घोगरे
परांडा/प्रतिनिधी
परांडा तालुक्यातील डोनजा येथील डोणजे विद्यालय डोणजे या शाळेतील विध्यार्थी नीं यश प्राप्त केल्यामुळे त्यांचा व पालकांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब सूर्यवंशी आणि क्रीडा शिक्षक सतीश घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला.धाराशिव येथे पार पडलेल्या जिल्हा कुस्ती स्पर्धेत 42किलो वजनी गटातून इयत्ता सातवीची विध्यार्थीनी श्रुती संतोष सूर्यवंशी हिने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकवला तर डोनजा गावचा दुसरा हिरा अर्णव श्रीमंत सूर्यवंशी याने 14वर्ष वयोगटातून 52किलो वजन गटामधून जिल्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.या दोन्ही खेळाडूंची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.स्पर्धेतील यशस्वी विध्यार्थी,क्रीडा शिक्षक सतीश घोगरे यांचा प्रशालेत सत्कार करण्यात आला.या वेळी सर्व मान्यवर पालक,मुखध्यापक आप्पासाहेब सूर्यवंशी,शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच विध्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन जोतिराम घोगरे यांनी केले..





















