जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा पाटोदा येथे आरोग्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
जनक्रांती न्युज/ प्रतिनिधी पाटोदा
दिनांक २२जुलै २०२५रोजी मंगळवारी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, पाटोदा येथे आरोग्य विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या तपासणीसाठी डॉ. इम्रान शेख आणि डॉ. पूनम तागड यांनी १ली ते ७ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक व बारकाईने वैद्यकीय तपासणी केली. सुदैवाने तपासणी दरम्यान कोणताही गंभीर आजार विद्यार्थ्यांमध्ये आढळून आला नाही, ही बाब शालेय प्रशासनासाठी दिलासादायक ठरली.या उपक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बांगर जयराम सर यांच्यासह शिक्षक श्रीमती बालीका वाघमारे, श्रीमती माया गर्जे, श्रीमती साधना काकडे, श्रीमती विद्या होनराव, श्रीमती ज्योती पवार, कु. घोलप ताई, कु. सुरेखा खेडकर, श्रीमती राधा हजारे, श्रीमती हिराबाई राऊत, तसेच बालू राऊत आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी या आरोग्य तपासणी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तपासणीसाठी आलेल्या दोन्ही डॉक्टरांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.शाळेत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निगा राखली जात असून, पालकांमध्येही आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होत आहे, असे मत यावेळी उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.





















