जामखेड येथील अवैध कला केंद्रावर कार्यवाही करण्यासाठी अमरण उपोषण सुरू!
बीड/प्रतिनिधी
जामखेड येथील अवैध कला केंद्रावर कार्यवाही करण्यासाठी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ तालुकाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजबे यांनी उपोषण सुरू केले आहे या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की जामखेड शहरात व लगत अवैध कलाकेंद्र असून तेथे कलाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत आहे. रात्री ४ ते ५ वाजेपर्यंत हे कलाकेंद्र चालू असतात आपल्याकडे दिनांक २५/१२/२०२४ रोजी तक्रारी अर्ज वेळोवेळी दिलेले आहेत. अवैध कलाकेंद्रामुळे बाहेरील गुन्हेगार हे जामखेडमध्ये वास्तव्यास असतात त्यामुळे जामखेडमध्ये गुन्हेगारी मुळे जामखेड मधील लोक भयभीत झालेले आहेत. या सर्व कलाकेंद्र मालकानी गुंड प्रवृत्तीचे लोक सांभाळले आहेत. या कलाकेंद्रामुळे जामखेड मध्ये राजरोसपणे मारामारी होत आहेत. जामखेड शहर व तालुका पूर्णपणे भयभीत झालेला आहे. तसेच मी या कारणामुळे दिनांक ०५/०२/२०२५ उपोषणास बसलो होतो. सदर उपोषण हे जामखेड तत्कालीन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी संबंधीत कलाकेंद्रावर कार्यवाही करण्यासाठी लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते. परंतू कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. तरी संबंधीत कलाकेंद्रावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.या साठी दिनांक २७/१०/२०२५ रोजी तहसील कार्यालय, जामखेड समोर अमरण उपोषण सुरू केले आहे तरी उपोषणा दरम्यान मला ही बरेवाईट झाल्यास संबंधीत कलाकेंद्र व प्रशासन जबाबदार राहील असे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ तालुकाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजबे यांनी म्हटले आहे .





















