जनतेची सेवा करण्यासाठी पद नव्हे तर मनातली जबाबदारी आणि ध्येय महत्त्वाचं असतं -मा.आ.पृथ्वीराज साठे
अंबाजोगाई/प्रतिनिधी
मा.आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांनी हेच सिद्ध करत कोरोना महामारीच्या कठीण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत जनतेच्या सेवेसाठी काम केले.आरोग्य व्यवस्था ताणलेली असताना, प्रशासन आणि नागरिक या दोघांमध्ये समन्वयाची मोठी गरज होती.अशा वेळी साठे साहेबांनी प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्यक्ष नागरिकांची विचारपूस केली, आरोग्य सुविधा, बेड, ऑक्सिजन, औषधे आणि उपचार याबाबत तातडीने मदत उपलब्ध करून दिली. भीतीचं वातावरण असताना, “मी आहे तुमच्यासोबत” हा विश्वास देत त्यांनी अनेक कुटुंबांना दिलासा दिला. आजही ते तितक्याच तत्परतेने रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतात, त्यांची विचारपूस करतात आणि आवश्यक ते उपचार तात्काळ मिळावेत यासाठी स्वतः लक्ष देतात.पद नसतानाही जनतेची सेवा हीच खरी ओळख आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. आजही पद असो वा नसो — जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर राहणे, हीच त्यांची खरी ताकद आहे.





















