खेड मावळ हवेलीतालुक्याने भाकरीचा भारा वाहण्याची स्वीकारली जबाबदारी देहू येथील संत तुकाराम अन्नदान मंडळातर्फे कंटेनर भरून मिठाई घेऊन मुंबई दिशेने रवाना!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे
मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मुंबईजवळ असलेले तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्याकडून न्याहारीची सोय करण्याचे नियोजन केले आहे. आळंदी देहू येलवाडी खालुब्रे इंदोरी या परिसरात सकल मराठा समाजाने चटणी भाकरी यांची मोठी जबाबदारी उचलली आहे. रविवार देहू येलवाडी येथून चटणी भाकरी घेऊन आंदोलक मुंबईकडे गेले.
मराठ्यांसाठी भाकरीचा भारा वाहण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.परिसरातील बांधवांनी मराठा लढ्यात सातत्याने चांगला सहभाग घेतला आहे. या उपक्रमासाठी समन्वयकांनी सकाळी केलेल्या आवाहनाला मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. अवघ्या काही तासांतच परिसरातुन माध्यमातून व पाणी बाक्स विविध खाऊ जमा झाली. मदतीचा ओघ अजूनही सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात देहू आळंदी चिखली खालुब्रे हातभार लावत आहेत.जिल्ह्याने हजारोच्या संख्येने चटणी, ठेचा, भाकरी राज्यातून आलेल्या मराठा आंदोलकांसाठी पुरवल्या जात आहे .रविवारी सकाळी मुंबईत उपासमार होऊ नये या हेतूने देहू आळंदी येलवाडी समाजबांधवांनी भाकरी एकत्रित करण्याचे नियोजन केले. सकाळी १०
वाजताच्या मुंबईकडे चटणी आणि भाकरी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. त्यावेळी खेड मावळ परिसरातील सकल मराठा वतीने भाकरी घेऊन मुंबईकडे रवाना झाले.श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम अन्नदान मंडळ यांच्याकडून एक कंटेनर भरून पाणी बॉक्स शंभर बिस्किट बाक्स शंभर
बुंदी लाडू बाक्स शंभर भाकरवडीचे बॉक्स शंभर विविध मिठाई शंभर असा मिठाई खाऊ भरलेला कंटेनर भरलेला( ट्रक) संत तुकाराम अनुदान मंडळातर्फे मिठाई घेऊन मुंबईच्या दिशेने दुपारी चारच्या दरम्याने रवाना झाला आहे या वेळी
बाबा भालेकर राजू बुजडे कंद सर सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते





















