खुपच खंत वाटत असेल आठवण येत असेल तर आ.धनंजय मुंडेने वाल्मीक कराड शेजारी जाऊन रहावे,बसावे-खा.बजरंग सोनवणे,आ.प्रकाश सोळंके
बीड/प्रतिनिधी
आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या वाल्मीक कराडबाबतच वक्तव्य केलं असावं, तो नसण्याची एवढी खंत वाटत आहे तर त्याच्यासोबत जाऊन बसा आणि खंत दूर करा.आमदार प्रकाश सोळुंके यांनी म्हटले आहे वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात आहे. धनंजय मुंडे यांनी परळी येथील जाहीर सभेत बोलताना एक व्यक्ती या ठिकाणी नसल्याची जाणीव होत असल्याचे वक्तव्य केले होते.यावरुन वाल्मीक कराडबद्दल फारच खंत वाटत असेलत तर त्याच्या शेजारी जाऊन बसा आणि खंत दूर करा असा टोला आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी सुध्दा म्हटले आहे जर खुपच खंत वाटत असेल तर वाल्मीक कराड शेजारी जाऊन रहावे असे मत खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.





















