कार्यकर्त्यांना एक विनंती,दररोज प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी साहेब त्याच पक्षात आहे ना ? याची दर तासाला अपडेट घेत जा, चर्चा सत्र?
बीड/प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा धुरळ उडत आहे परंतु नेत्यांचे तिकीट मागण्यांसाठी घालमेल होताना दिसत आहे पक्षाचे तिकीट भेटते का अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागते एवढच पुढाऱ्यांच्या डोक्यात घंटी वाजत आहे परंतु त्यामध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांची मात्र मध्येच फजीती होते त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपले नेते कोणत्या पक्षात आहेत याची अपडेट एक तासाला घ्यावी कारण आजकाल नेत्यांच अस झाल आहे की पावसाळ्यातल्या बेडका सारख निवडणूक आली की बाहेर निघायच व या पक्षातुन त्या, पक्षात त्या पक्षातुन या पक्षात बेडका सारख्या उड्या मारत आहेत व एक तासाला या पक्षात आहेत तर दुसऱ्या तासाला दुसऱ्या पक्षात त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रचार करताना साहेब कोणत्या पक्षात आहेत याची विचारपूस करणे गरजेचे आहे असे चर्चा नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















