Homeताज्या बातम्याकळंब नगरपरिषदेकडून घरकुल वाटपात गैरप्रकार/ आमरण उपोषणाचा इशारा !

कळंब नगरपरिषदेकडून घरकुल वाटपात गैरप्रकार/ आमरण उपोषणाचा इशारा !

धाराशिव/प्रतिनिधी

कळंब शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगरपरिषदेकडून घरकुलांचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेचा मूळ उद्देश गरीब व उपेक्षित घटकांना घर बांधणीसाठी मदत करून स्वतःचे घर उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र या योजनेतच बोगस घरकुल वाटप झाल्याची चर्चा सध्या जोर धरत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लाभार्थ्यांकडे आधीपासूनच आर.सी.सी. बांधकाम असलेली घरे असून, दोन मजली घरे असणाऱ्यांनादेखील घरकुल योजना मिळाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खऱ्या गरीब व बेघरांना या योजनेचा लाभ न मिळता सक्षम लोकांच्या खिशात तो जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या संदर्भात तक्रारदार खादीम सय्यद यांनी एप्रिल महिन्यातच नगरपरिषदेकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, अजूनपर्यंत त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सय्यद यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद कळंब यांची भेट घेण्यासाठी दोन-तीन वेळा प्रयत्न केले, परंतु त्यांना भेट घेता आली नाही. नगरपरिषद प्रशासन कारवाई करण्याऐवजी संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नगरपरिषद कळंब यांच्याकडून कारवाईत होत नसल्याकारणाने त्यांनी पुराव्यासाहित जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केल्याची माहिती देखील त्यांनी दिली. याबाबत बोलताना सय्यद यांनी सांगितले की, “हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. जर नगरपरिषदेकडून वाटप केलेल्या सर्व घरकुल वाटपाची चौकशी झाली तर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघड होण्याची शक्यता आहे.” त्यांनी पुढे इशारा दिला की, “संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करण्याचा मार्ग अवलंबू.” या सर्व प्रकरणामुळे नगरपरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी सर्व अर्जाची पुनर्पडताळणी करून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!