ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार /शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुका प्रमुख संजय पौळ !
सोलापूर : – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उत्तर सोलापूर तालुका यांच्या वतीने आज , संपूर्ण उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कडे करण्यात आली .संपूर्ण महाराष्ट्र व देशभरात पावसाने थैमान घातले असून नद्या नाले ओसंडून वाहत आहेत मे 2025 मध्ये पडलेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे करून चर्चा महीने उलटून गेले आहेत तरीसुद्धा शासनाने आजतागायत एका दमडीची ही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही याचा आम्ही शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या वतीने जाहीर निषेध केला आहे .सतत च्या पडणाऱ्या पावसाला कंटाळून शेतकरी मेटकुटीला आला आहे अवकाळी पावसात बाधीत झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम प्रशासनाकडे जमा असून व जाहीर केली असताना सुद्धा , के वाय सी , ऑनलाईन सर्व्हर , ची अनावश्यक कारणे पुढे करून शेतकऱ्यांना झूलवत ठेवण्याचा प्रकार झाला आहे .13 मे ते आज रोजी पर्यंत सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यात सर्वाधीक पाऊस पडल्याची नोंद शासनाकडे असून सुद्धा आणी नियमानुसार 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यास कायदेशीर रित्या ओला दुष्काळ जाहीर करावा व शासकीय नियम व निकषाच्या बाहेर जाऊन हेक्टरी 50 हजार रु ची मदत प्रती शेतकरी जाहीर करावीच अशी मागणी पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख संजय पौळ यांनी केली .अन्यथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे व संपर्क प्रमुख अनील कोकीळ साहेब यांच्या आदेशानुसार , गणेश दादा वानकर यांच्या मार्गदर्शनाने उत्तर सोलापूर तालुक्यातील जगाचा पोशिंदा असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या हित रक्षणासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख संजय भा पौळ यांनी दिला .याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे , उप तालुका प्रमुख अच्चूतराव बाभळे , दादासाहेब काशीद तसेच उपतालुका प्रमुख सदाशिव सलगर , सचीन घोडके , उप विभाग प्रमुख अरुण लोंढे , माजी सरपंच राजू घाटे बाबा लोंढे, अजिनाथ कांबळे , यांच्या सह इतर पदाधिकारी व शेतकरी शिवसैनिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती





















