ओबीसी मधुन मराठा आरक्षणाला विरोध करणाराचा जि.प.पं.स. महापालिका नगरपालिका निवडणुकीत हिशोब मराठे करणार का ?- मनोज जरांगे पाटील
संपादकीय/रोहन गलांडे पाटील
संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मागिल दोन वर्षांपासून मराठा समाज आरक्षण मिळवून देण्यासाठी जिवाचे रान केले आहे तसे पहायला गेले तर मराठा आरक्षणाचा संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाचवीला पुजलेला होता की काय कारण अनेक छोट्या मोठ्या आंदोलना नंतर मराठा समाजाला यश मिळाले आहे व त्यांच काळात मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून गाव खेड्यापाड्यातील अनेक छोट्या मोठ्या भुरट्या पुढाऱ्यांनी विरोध केला होता व आता जिल्हा परिषद पंचायत समिती गणातुन निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघत आहेत व त्यांचा हिशोब मराठे करणार असे संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी म्हटले आहे व तीच वेळ आता आली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांचा हिशोब मराठे करणार का असा सवाल संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी केला आहे.





















