ईटकूरची डॉ.संपदा रणदिवे हि एआयएसीजीईटी (एम डी) परिक्षेत देशात चौथी!
जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव प्रतीनीधी
धाराशिव:- कळंब तालुक्यातील ईटकुर येथील डॉ.संपदा अशोक रणदिवे डॉ. संपदा चे वडील कळंब एस टी डेपो येथे मेकॅनिक म्हणुन नौकरी करतात मुलांच्या शिक्षणासाठी ते कळंब या ठिकाणीं स्थाईक झाले आहेत डॉ. संपदाचे १० वी पर्यंतचे शिक्षण कळंब येथे झाले आणि उच्च शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय अंबेजोगाई या ठिकाणीं झाले त्यानंतर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड या ठिकाणी बी ए एम एस डिग्री प्राप्त करुन तिने पुढील (एम् डी) या शिक्षणा साठी तयारी करत डॉ.संपदाने महाराष्ट्रात नव्हे तर चक्क भारतात ऑल इंडिया आयुष्य पोस्ट ग्रॅज्युएट एट्रान्स परिक्षा अर्थात एआयएसीजीईटी (एम डी) या देशपातळीवरील परीक्षेत भारतातून ७७ वा नंबर व कॅटेगिरी मधून भारतातून ४ था (चौथा) नंबर पटकाविला आहे त्यासाठी इ.सन २०२५ साठी एकूण ४२ हजार डॉक्टरांनी परीक्षा दिली होती.त्या पैकी २ हजार २७४ जागा उपलब्ध असतात त्यामध्ये डॉ .संपादने भारतातून ७७ वा नंबर व कॅटेगिरी मधून भारतातून ४ था (चौथा) नंबर पटकाउन आपल्या आई वडिलांचे कुटुंबाचे व समाजाचे स्वप्न पुर्ण करुन एक आगळा वेगळा आदर्श सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवला आहे. डॉ.संपदाच्या यशाचे कौतुक पूर्ण जिल्ह्यातून सर्व स्थरातून होत आहे. आशा जिद्दीवान व आपल्या आई वडिलांचे स्वप्न पुर्ण करणाऱ्या डॉ.संपदास पुढील वाटचालीस शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.





















