आवारे पाटील यांच्या वतीने परळी तालुक्यातील वानटाकळी येथील नादुरुस्त पुल दुरुस्त !
परळी/प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या वतीने परळी तालुक्यातील वानटाकळी येथील नादुरुस्त फुल दुरुस्त करून दिला. गेला सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे परळी तालुक्यातील वानटाकळी येथील अतिवृष्टी चा फटका बसला होता यापुरामध्ये वाणटाकळी ते परळी जाण्याच्या रस्त्यावर फुल आहे या पुलाची मोठ्या प्रमाणात पडझड होती. त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर तात्काळ त्यांनी निर्णय घेत वाण टाकळी येथील पुलाची पडझड झालेली दुरुस्ती करून दिली आहे त्यामुळे लोकांना जाण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत होता पुलाचे पडजळ झाल्यामुळे लोक खूप संघर्ष करून रहदारी करत होते आज शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने दुरुस्त करून देण्यात आला आहे त्यामुळे त्यांचे वाणटाकळी गावातील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे तसेच मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव सुनील आजले बाबासाहेब घाडगे ऋषिकेश मुंडे बंडू गोचडे राम किर्दन्त अतुल घाडगे सह इतर गावातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होतेयावेळी बोलताना गावाकऱ्यांनी आमदार खासदार यांच्या कानावर घालून सुद्धा हो करू बघू असे आश्वासन दिले आणि बघून निघून गेले त्यामुळे गावाकऱ्यांनी संताप व्यक्त केला





















