आमदार पती अक्षय मुंदडा आपन बोरगावला पर्यटक म्हणून आलता का?-संतोष गव्हाने
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बोरगाव,राजेगाव मांजरा काठावर शेतकऱ्यांच्या पीकाची होळी झाली आहे व आमदार पती अक्षय मुंदडा बोरगाव येथे आले असता फक्त गाडीतून पहानी केली व निघून गेले असे संतोष गव्हाने यांनी म्हटले आहे त्यामुळे आमदार पती काय नुसते नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते का पर्यटक म्हणून आले होते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण बोरगाव सह अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे तेथील नागरिकांचे जीवन धोक्यात आहे व केज आंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पती पर्यटक असल्या सारखे गाडीच्या खाली नाही उतरता फेरफटका मारुन गेले असे संतोष गव्हाने यांनी म्हटले आहे.





















