Homeताज्या बातम्याअंबाजोगाईतील सुसंस्कृत मंडळींची राजकिशोर मोदी यांना प्रथम पसंती/अंबाजोगाईची संस्कृती पुढे नेणार्‍याला मतदार...

अंबाजोगाईतील सुसंस्कृत मंडळींची राजकिशोर मोदी यांना प्रथम पसंती/अंबाजोगाईची संस्कृती पुढे नेणार्‍याला मतदार देणार प्राधान्य !

अंबाजोगाईतील सुसंस्कृत मंडळींची राजकिशोर मोदी यांना प्रथम पसंती /अंबाजोगाईची संस्कृती पुढे नेणार्‍याला मतदार देणार प्राधान्य !

अंबाजोगाई /प्रतिनिधी

 अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक मोठ्या धामधुमीत सुरू आहे. प्रामुख्याने दुरंगी लढत या ठिकाणी होत आहे. या दुरंगी लढतीमध्ये शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आणि गावचे गावपण हे अबाधित रहावे यासाठी अंबाजोगाई शहरातील सुज्ञ आणि सुसंस्कृत मंडळींनी माजी नगराध्यक्ष तथा लोकविकास महाआघाडीचे नगराध्यक्ष  पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांना  प्रथम पसंती दर्शविली आहे. कारण ही निवडणूक दोन दिवसाची नाही तर पाच वर्षाचे भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे गावची सुत्रे देताना मतदार राजा विचार करू लागला आहे. अंबाजोगाई शहराचे राजकारण प्रामुख्याने गेल्या 35 वर्षापासुन राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली आहे. 25 वर्षापासुन एकहाती सत्ता नगर  पालिकेवर राहिलेली आहे. अंबाजोगाईकरांनी शहराचे भविष्य लक्षात घेवून आणि गावातील शांततेचे वातावरण कायम राहिले पाहिजे. यासाठी प्रामुख्याने आमदारकीला मुंदडा कुटूंबिय तर नगर पालिकेला राजकिशोर मोदी यांना समर्थ साथ आणि पाठींबा दिलेला आहे. परंतु या निवडणूकीमध्ये ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा उतरल्याने मतदारांची अवस्था ही संभ्रमीत झाली आहे. आता मतदार राजा बोलु शकत नाही. कारण त्यांचा निकाल हा मतपेटीतून बाहेर येणार आहे. आज बोेलुन विनाकारण संंबंध खराब करून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी मतपेठीत मतदान करणे आहे. हे समजून घेत मतदान करणार असल्याचे दिसत आहे. मोदी यांनी अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. आज वेगवेगळे आरोप त्यांच्यावर लावले जात आहेत. परंतु मोदी यांच्यामते ते निखलास खोटे आहेत. बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगत आहेत. मोदी यांनी अंबाजोगाई शहरासाठी काय केले. हे लोकांसमोर आहे. तसेच आमदार नमिताताई मुंदडा यांनी सुद्धा काय केले हे मतदारांसमोर आहे. याचे अवलोकन करत मतदार राजा आपला अधिकार बहाल करणार आहे. मोदी यांचे काम सिमित नाही. व्यापक आणि दुरदृष्टीचे राहिलेले आहे. साधारणतः 1989 साठी स्थापन केलेल्या योगेश्‍वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्या काळात रस्त्यावरील हॉटेल वाल्यास आणि पानटपरीवाल्यास पाच हजार रूपये अर्थसहाय्य केल्याने आज 36 वर्षानंतर त्या माणसांचे जीवन बदललले आहे. सामान्य माणसाला व गरीबाला कुठलीही बँक किंवा पतसंस्था मदत करत नाही. कारण त्याची पत आणि प्रतिष्ठा दोन्हीपण नसते. म्हणून त्यांना कोणी कर्ज देत नाही. अशा माणसांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना उभे करण्याचे काम केले आहे. योगेश्‍वरी पतसंस्था असेल, अंबाजोगाई पिपल्स बँक असेल, योगेश्‍वरी मल्टीस्टेट असेल, सावित्रीबाई फुले महिला नागरी पतसंस्था असेल, अलफलाह पतसंस्था असेल यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मोदी यांनी केलेला आहे. ज्यांना लाखो आणि कोटीमध्ये अर्थसहाय्य पाहिजे. त्यांना अंबाजोगाई पिपल्स बँकेने दिलासा दिलेला आहे. आणि त्यांचा उत्कर्ष केलेला आहे. छोटे-छोटे व्यवसायीक आहेत. त्यांना या छोट्या संस्थांकडून अर्थसहाय्य केलेले आहे. मोदी यांनी माणूस उभा करण्याचे पुण्य केले आहे. त्यासोबतच नगर परिषदेत काम करत असताना नागरी प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक माणूस प्रयत्नवादी असतो. परंतु सगळ्याच कामांना यश येईल. याची शाश्‍वती नसते. दहा कामे हातावर घेतली. तर त्यातील किमान सहा होतील आणि चार बारगळतील त्यापैकी गेल्या 25 वर्षाच्या राजकिय कारकिर्दीमध्ये बरेच काम त्यांनी उभे केले आहे. 25 वर्षापुर्वीचे किंवा त्यानंतरचे काम जर कुठे आहे. असे विचारले तर विरोधकांना उत्तर कसे देणार जे काम आहे. ते नजरेत भरण्यासारखे  आहे. ज्यांना जाणून घ्यायचेच नाही. केवळ टिका टिप्पनी करावयाची आहे. त्यांना या बाबी दिसणार नाहीत. अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहाला जो आज आकार आणि चांगलेपण आले  आहे. ते मोदी यांच्या कार्यप्रणालीमुळे आलेले आहे. त्यासोबतच स्व.विलासराव देशमुख न.प.सभागृह, ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृह, सदर बाजार भागात शदीखाना, मुकुंदराज विद्यालयासमोरील शॉपींग कॉम्प्लेक्सवर उभारलेले सभागृह तसेच अंबाजोगाई शहरातील विविध ओपन स्पेस डेव्हलप केला आहे. मोदी यांचे काम नक्कीच इतरांपेक्षा काकणभर जास्त राहिलेले आहे. अल्पसंख्याक समाजातील असल्याने त्यांना प्रत्येक माणूस हवा-हवासा वाटतो म्हणून ते प्रत्येकाच्या सुखःदुखात धावून जातात. अनेकांच्या जीवनाला रंग देण्याचे काम त्यांनी केले आहे. तर अनेकांच्या जगण्याचे सार ते झालेले आहेत. म्हणून राजकिशोर मोदी यांना बदनाम करून सत्ता खेचण्याचा जो केविलवाना प्रयत्न होतो आहे. तो अंबाजोगाईकरांना आवडेल असे दिसत नाही. कारण मोदी यांची ओळख व प्रतिमा वेगळी आहे. काम करणारा आणि कामासाठी धडपडणारा माणूस आहे. लाखात एक अशी त्यांची ओळख आहे. राज्य पातळीवर पापा मोदी या नावाला ओळख मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख, लोकनेते स्व.बाबुरावजी आडसकर यांचे मानसपुत्र म्हणून त्यांनी जबाबदारी निभावलेली आहे. मोदी हे दोन अक्षरे असली तरी या दोन अक्षरांनी मोठी किमया शहरावर केली आहे. ज्यामध्ये शिक्षण संस्था, बँका, पतसंस्था, सहकार, उद्योग, सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक व इतर कार्यामध्ये त्यांचा हात धरेल असे नाही. त्यामुळे सुज्ञ आणि सुसंस्कृत अंबाजोगाईकर आजही मोदी यांना सोडायला तयार नाहीत. प्रतिस्पर्धांशी विरोध नाही. परंतु गावच्या विकासासाठी राजकिशोर मोदी हेच एकमेव पर्याय असल्याचे मानले जाते. आजही लोकांच्या व मतदारांच्या मनात पापा मोदी या नावाने कोरली आहे. त्यामुळे मोदी यांना सर्वस्तरातून वाढता पाठींबा मिळतो आहे. कपबशी हे विजयाचे प्रतिक असून नशिबाचा कौल सुद्धा त्यांच्या बाजूने गेला आहे आणि सोडप पद्धतीमध्ये सुद्धा त्यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. जिंकणार तर मोदीच आहेत. अशी जनसामान्यांची भावना आहे. त्यामुळे मोदी यांचा विजय अटळ मानला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!