Homeताज्या बातम्यासुरक्षिततेचा धडा देणारी बालसभा – ‘गुड टच, बॅड टच’ संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...

सुरक्षिततेचा धडा देणारी बालसभा – ‘गुड टच, बॅड टच’ संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

सुरक्षिततेचा धडा देणारी बालसभा – ‘गुड टच, बॅड टच’ संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

बर्दापूर /प्रतिनिधी

सरस्वती न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, बर्दापूर येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसाठी विशेष बालसभेचे आयोजन करण्यात आले. या बालसभेमध्ये ‘गुड टच – बॅड टच (चांगला स्पर्श – वाईट स्पर्श)’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून बालसुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी अध्यक्ष अमृता चव्हाण होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून स्नेहल सोमवंशी उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. ताराचंद शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव तसेच शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली. विद्यार्थिनी श्रेय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत संपूर्ण कार्यक्रमात संयम व उत्साहाचे वातावरण निर्माण केले.या बालसभेत विद्यार्थ्यांना योग्य व अयोग्य स्पर्श यातील फरक समजावून सांगण्यात आला. कोणत्याही संशयास्पद परिस्थितीत घाबरून न जाता विश्वासू व्यक्तींशी संवाद साधण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. अनोळखी व्यक्तींशी वागण्याबाबत खबरदारी, समाजात वावरताना घेण्याच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना यावर विशेष भर देण्यात आला.प्रमुख पाहुण्या स्नेहल सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्भयतेची भावना निर्माण करण्याचा संदेश दिला. नियमांचे पालन केल्याने व योग्य वेळी मदत मागितल्यास कोणत्याही अडचणींवर मात करता येते, असे त्यांनी नमूद केले.संस्थेचे अध्यक्ष श्री. ताराचंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत शाळा नेहमीच सुरक्षिततेला प्राधान्य देईल, असे सांगितले.मुख्याध्यापक श्री. मधुकर जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अशा उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच ते स्वतःबद्दल सजग बनतात, असे मत व्यक्त केले. भविष्यात अशी जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या समाप्तीप्रसंगी विद्यार्थी आविष्कार शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या बालसभेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढून शाळेचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!