देशमुख हत्याकांडातील आरोपी सुटल्यास महाराष्ट्र बंद करणार/दोन महिन्यात धनंजय मुंडेंना सहआरोपी न केल्यास रस्त्यावर उतरणार !
केज/प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला काल एक वर्ष पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पीडित देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात निकाल येण्यासाठी वर्ष उजडणार नाही असं वाटलं होतं, त्याच्या वल्गना मुख्यमंत्र्यांकडून झाल्या होत्या. एक वर्षाच्या आत या आरोपींना फासवर लटकू असा शब्द दिला होता. मात्र, या प्रकरणात दिरंगाई होत आहे. सरकार पक्षात अजितदादांचा एक आमदार आहे, त्यांनी एक टायर पंक्चर केलेलं आहे, तोच या प्रकरणात यंत्रणा चालवत आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता पुन्हा एकदा आमदार धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं. हे प्रकरण भिजत गोंधळ ठेवायचं आहे का अशी शंका येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
कृष्णा आंधळे कुठे आहे, का सापडत नाही?
धन्यानीच हा सगळा प्रकार घडून आणला आहे, जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही कुणीही मागे हटणार नाहीत. ज्या दिवशी ती सुटेल त्या दिवशी राज्यात चाक देखील फिरणार नाही. आधी या प्रकरणाच्या तपासाचा वेग योग्य वाटत होता, कारण काय आहे.
विकासाच्या कामात पोलीस महासंचालकांचे काय काम ?
क्रूर हत्या करणारे सापडत नाहीत, तुमच्यासाठी परळीवाला महत्त्वाचा आहे का? आंधळेने मारतानाचे व्हिडिओ कॉल केले आहेत, तो पकडला की या प्रकरणाचा मोठा उलगडा होईल. आज अधिवेशनात देशमुख प्रकरणाचा मुद्दा उचलला गेला आहे, इतकी क्रूर हत्या आहे. सरकारने हा विषय चार-पाच महिन्याच्या आत संपवावा पुढे कुटुंबानी हाक दिल्यास आम्ही कशाचा विचार करणार नाहीत. ओबीसीचे नेते कितीतरी आहेत त्यांना मोठे करा. अशा दूर लोकांना सांभाळत असाल तर आम्हाला अजित दादाचा राग येणार, तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ करत आहात. काल तर तो त्यांना घेऊन गेला, अजित पवार आणि त्याची बैठक झाली. पोलीस महासंचालकत्वी बैठक इवली, पण विकारराच्या कामाल पोलीस महासंचालकाचे काय काम? काहीतरी शिजत आहे, फडणवीस तुम्ही याच्यात सहभागी होऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.





















