श्री संत बाळूमामा यांची परज व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन !
केज/प्रतिनिधी
केज येथे शुक्रवार रोजी श्री संत बाळूमामा यांची परज व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी केज तालुक्यातील भाविक भक्त व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळुमामा भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०-३० वाजता केज शहरातील चादर यांच्या निवासस्थान येथून शिक्षक पतपेढी पासून श्री संत बाळूमामा यांची परज निघणार आहे सदर परजेचा कार्यक्रम हा शिक्षक पतपेढी पासून उमरी रोड मार्गे उमरी रोडवरील श्री संत बाळूमामा मंदिर येथे परज पोहोचणार आहे. श्री बाळूमामा मंदिर येथे परज आल्या नंतर श्री संत बाळूमामांची आरती झाल्यानंतर दुपारी १-३० ते ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या महाप्रसादाचे अन्नदाते म्हणून दादाराव मल्हारी लांडगे हे अन्नदानाचे काम करणार आहेत. तरी या कार्यक्रमास केज शहरासह परिसरातील भाविक भक्त व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चादर परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.





















