Homeताज्या बातम्यापरळीत खा.सोनवणेंचा मास्टरस्ट्रोक; मुंडेंना धक्का देत माजी नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश/मुंबईत शरद पवार...

परळीत खा.सोनवणेंचा मास्टरस्ट्रोक; मुंडेंना धक्का देत माजी नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश/मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी घेतली हाती !

परळीत खा.सोनवणेंचा मास्टरस्ट्रोक; मुंडेंना धक्का देत माजी नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश/मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी घेतली हाती !

परळी /प्रतिनिधी

परळीत मुंडेंच्या एकाधिकारशाहीला सूरूंग लावण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी नवनवीन डाव टाकायला सुरूवात केली असून आ.मुंडे यांचे सहकारी तथा परळीचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमूख आणि पत्नी संध्याताई देशमूख यांनी दि.१० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (शरद पवार गट) प्रवेश केला. सदरील प्रवेश पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.परळीत आ.धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी सुरूवात केलेली आहे.नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गट ताकदीने उतरणार असल्याने शहरातील मात्तबर मंडळी मुंडेंना सोडून पर्यायाची चाचपणी करत आहे. ज्यांना शहराचा विकास व्हावा, असे वाटत आहे, अशी मंडळी मुंडेंपासून दूर होवू लागली असून यात माजी नगराध्यक्ष दिपक देशमूख, त्यांच्या पत्नी संध्याताई देशमूख यांनी खा.बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज मुंबईत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आ.जितेंद्र आव्हाड, पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांची यांची उपस्थिती होती. दिपक देशमूख हे परळीच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी परळीचे नगराध्यक्षपदही भुषविलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात परळी शहरात मोठ्या प्रमाणात दर्जेदार विकास कामेही झालेली आहेत. दरम्यान, प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना दिपक देशमूख म्हणाले, येथील आमदार सत्ताधाऱ्यांचे काम पाहिले तर कोणतेही विकास काम त्यांनी केलं नाही. जे काही कामे केली त्यात भ्रष्टाचार करण्यात आला. आम्ही वारंवार ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातल्यावरही यावर कुठला मार्ग निघाला नाही. परळीतील अर्धवट विकास कामे यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यापासून मी या कामाला लागलो होतो. मी लोकसभेला पंकजा मुंडे यांचे काम केले त्यानंतर विधानसभेला धनंजय मुंडे यांचे काम केले, असेही ते म्हणाले.

चौकट:-

दिपक देशमूख हे परळीचा विकास व्हावा, यासाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेले आहेत. परळीत कुणाची किती ताकद आहे, ते आता कळणार असून परळीचा गड आम्ही राखू. परळीत सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित बसवून परळी नगर पालिकेचा उमेदवार ठरवला जाणार आहे.-खा.बजरंग सोनवणे, बीड.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!