जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाची एसआयटीमार्फत चौकशी करावी/अन्यथा,शिवबा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार- अजित सुरवसकर
तालुका प्रतिनिधी : उत्तर सोलापूर
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट करणारा कोणीही असो, त्याची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवबा संघटनेने केली आहे.शिवबा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर यांनी सरकारकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर सरकारने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले तर शिवबा संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.सुरवसकर म्हणाले, “जो कोणी पण जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटात सामील असेल, त्याची त्वरित चौक शी करून अटक करण्यात यावी. एसआयटीमार्फत पा-रदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मराठा समाज कदापी शांत बसणार नाही.” या प्रकरणी सरकारने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी केली आहे.





















