Homeताज्या बातम्यासामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेतच मोठा आर्थिक गैरव्यवहार !

सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेतच मोठा आर्थिक गैरव्यवहार !

सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेतच मोठा आर्थिक गैरव्यवहार !

केज/प्रतिनिधी

सामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या यंत्रणेतच मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील इस्थळ येथील आरोग्य उपकेंद्राच्या बळकटीकरणासाठी मंजूर झालेला ₹ १ लाख १६ हजार ६९४ चा निधी अधिकार नसताना परस्पर उचलल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात बुधवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काय आहे नेमके प्रकरण?सन २०२४ या वर्षात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, इस्थळसाठी बळकटीकरणाचा निधी बँक खात्यात जमा इस्थळचे सरपंच आणि तात्कालीन आरोग्य सेविका (श्रीमती रेड्डी) यांना होता. मात्र, श्रीमती रेड्डी यांची बदली झाल्यानंतर आरोग्य सेविका मनीषा पानसरे यांना रक्कम काढण्याचे कोणतेही अधिकार नव्हते. तरीही, आरोग्य सेविका मनीषा पानसरे यांनी दि. १३ जून २०२४ रोजी आयडीबीआय बँकेच्या बनसारोळा शाखेतून ही संपूर्ण रक्कम काढल्याचे चौकशीत उघड झाले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी केलेल्या सखोल चौकशीत, मनीषा पानसरे यांनी बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाजुद्दीन कमरुद्दीन मोमीन यांच्या सांगण्यावरून आणि आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी (अज्ञात) यांच्याशी संगनमत करून सदर शासकीय निधीचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांनी संगनमत करून शासनाची १ लाख १६ हजार ६९४ रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बँक अधिकाऱ्यांचा दावाः आम्हाला विनाकारण गोवले

या प्रकरणात बँक अधिकाऱ्यांनी मात्र वेगळा दावा केला आहे. आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी दीपक कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा पानसरे यांना रक्कम देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीत सही नमुना बदलण्याचा अर्ज, चेक, ओळखपत्र आणि रक्कम देण्याचे पत्र बँकेकडे देण्यात आले होते. तसेच, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून खात्री करूनच रक्कम देण्यात आली होती. बँकेकडे सर्व पुरावे असतानाही आपल्याला विनाकारण गोवण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!