कर्मयोगी शिक्षण महर्षी शामराव गदळे गुरुजी व बाळू ताई शामराव गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विविध लोक उपयोगी सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन !
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील शाम विद्यालयात संस्थेचे संस्थापक शामराव गदळे गुरुजी व त्यांच्या धर्मपत्नी बाळू ताई गदळे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भारुड, मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, किर्तन व विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंताचा सत्कार अशा विविध उपक्रमाचे आयोजन केलेले आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की शामराव गदळे गुरुजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये 1967 ला वडमाऊली विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना करून तिच्या मार्फत शाम विद्यालय श्याम कनिष्ठ महाविद्यालय व शाम वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले आणि ज्या काळात संपूर्ण समाज अक्षरापासून वंचित होता अशा ग्रामीण भागातील समाजाच्या मुलांच्या हाती वही आणि पेन देण्याचे काम शामराव गुरुजी यांनी केले या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या शाखा मधून अनेक मुलं डॉक्टर इंजिनिअर वकील शिक्षक झाली हे कार्य करत असताना त्यांना फार मोठा सामाजिक आर्थिक व राजकीय संघर्ष करावा लागला होता संघर्षाच्या काळात व शेवटच्या क्षणापर्यंत खंबीर आणि निर्भयपणे साथ देण्याचे काम त्यांच्या पत्नी, बाळू ताई यांनी केले अशा या पुण्यात्म्याचे पुण्यस्मरण एक नोव्हेंबर 2025 या दिवशी आहे त्यानिमित्ताने 31 ऑक्टोबर 2025 ला संध्याकाळी नऊ ते अकरा या वेळेत विनोदी भारुडाचा कार्यक्रम होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक नोव्हेंबरला सकाळी नऊ ते अकरा या वेळेत रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे आरोग्य तपासणी मध्ये नामवंत तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत त्यामध्ये डॉक्टर बालासाहेब कराड डॉक्टर रोहन गायकवाड डॉक्टर अनंत मुळे डॉक्टर लक्ष्मण वारे डॉक्टर अमोल गीते डॉक्टर चंद्रकांत तोंडे डॉक्टर गणेश देशमुख डॉक्टर माधुरी माळेकर डॉक्टर सुरेश ठोंबरे डॉक्टर गंगाराम डोंगरे व डॉक्टर रामप्रभू तिडके हे रुग्णांची तपासणी करणार आहेत त्यानंतर अकरा ते एक या वेळेत महाराष्ट्रातील ख्यातनाम विनोदी कीर्तनकार ह भ प शिवलीला ताई पाटील यांचे कीर्तन होईल त्यानंतर विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या यशवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होईल व त्यानंतर भोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे वरील सर्व कार्यक्रमाचा लाभ परिसरातील व तालुक्यातील सर्व मंडळींनी घ्यावा अशी विनंती श्री सकाहरी गदळे डॉक्टर शशिकांत दहिफळकर, श्री शरद गदळे, डॉक्टर शालिनीताई कराड सरपंच सौ अनिता शशिकांत गदळे, प्राचार्या जयश्री शरद गदळे, प्राचार्य राहुल गदळे व जयदत्त गदळे यांनी केली आहे अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांना प्राध्यापक मा सरपंच तात्यासाहेब डोईफोडे सर यांनी दिली आहे





















