केज महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार/एक -दोन तास लाईट नसल्याने रूग्णालयातील रुग्णांचे हाल ?
केज/प्रतिनिधी
केज शहरात महावितरण कंपनीचा मनमानी कारभार असल्या सारखे झाले आहे लाईट कधी येते तर कधी जाते असा भोंगळ कारभार सुरू झाला आहे व त्यामुळे शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रिपोर्ट तयार करण्यासाठी, इतर लाईट वर चालणाऱ्या सुविधा रुग्णालयातील रुग्णांनाला लाईट नसल्याने मिळत नाहीत त्यामुळे लाईटच्या अभावी रुग्णांची गैरसोय होत आहे असे रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या रुग्णालयातील नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच रुग्णांनानी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रिपोट वगैरे मागितले तर लाईट नाही असे सांगण्यात येत यामध्ये केज उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठांची सुध्दा मोठी चुक आहे परंतु महावितरण व रुग्णालय दोन्ही शासनाचा भाग आहे मग दोन्ही शासनाच्या मध्ये सर्वसामान्याचे हाल कशामुळे असा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे महावितरण व रुग्णालय प्रशासनाने तातडीने वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















