जिओ कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर?/चिंचोली माळी येथील अनेक ग्राहकांनी केले सिम पोर्ट!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील टाॅवर अनेक दिवस झाले बंद पडले आहे परंतु जिओ कंपनीचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत.आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता आठ दिवस सुरू होण्यासाठी लागतील असे म्हटले परंतु पंधरा दिवस झाले लक्ष घातले नाही तरी टाॅवर बंद पडल्याने चिंचोली माळी येथील अनेक ग्राहकांनी जिओ सिम कार्ड इतर कंपनी मध्ये पोर्ट केले आहे त्यामुळे जिओ कंपनीवर अनेक ग्राहक नाराज झाले आहेत त्यामुळे चिंचोली माळी येथील जिओ कंपनीचे सिम कार्ड नाहीसे होत चालले आहे जिओ कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















