कोरडेवाडी येथील उपोषणस्थळी मा.जि.प.सदस्य विजयकांतभैय्या मुंडे यांची भेट !
बीड/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी काल दि.१०ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भेट दिली. प्रतिष्ठानच्याराजश्री उंबरे यांचे हे उपोषण गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. आणखी ही या उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली नाही.धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळराजे आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे जनआंदोलन उभे राहिले आहे.कोरडेवाडी येथील साठवण तलावाला ‘पाणी उपलब्धता प्रमाणपत्र’ मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.माजी लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषक राजश्री ताई उंबरे यांच्या तब्येतीची चौकशी केली.कोरडेवाडी व परिसरातील जनतेच्या अत्यंत महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या प्रश्नाला पाठिंबा देऊन त्यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान आणि राजश्री ताई उंबरे यांनी उभारलेल्या या लढ्यात आपण सर्वांच्या सोबत आहोत. जनतेच्या हक्कासाठीच्या संघर्षात पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.उपोषणाला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.यावेळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोरडेवाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी चंद्रकांत कुलकर्णी आणि दिपक वाघमारे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची मागणी मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.





















